बसवेश्वर महाराजांचे विचारच समाज घडवतील 

बसवेश्वर महाराजांचे विचारच समाज घडवतील 

उदगीर (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वर हे 18 व्या शतकात सामाजिक समतेची घडी बसवण्याचा विचार करणारे महात्मा होते. आजही त्यांचे विचारच देशामध्ये एकता प्रस्थापित करून सामाजिक जाणीव निर्माण करू शकतात. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्ती संभाजी सांगवे (सोनकांबळे) यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकांनी महात्मा बसवेश्वर जयंती घरामध्येच साजरी करावी. असे महसूल प्रशासनाने आदेशित केल्यानंतर कोरोना च्या अनुषंगाने दिलेल्या आवश्यक सूचनांचा विचार करून सिद्धार्थ सोसायटी येथील आपल्या निवासस्थानी जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांची जयंती राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. अत्यंत मर्यादित स्वरूपातील जाणकार मंडळी आणि युवक वर्गांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.

 याप्रसंगी बोलताना निवृत्तीराव सांगवे यांनी स्पष्ट केले की, महात्मा बसवेश्वर म्हणजे परमेश्वराने भारत देशाला दीलेली अनमोल देण आहे.देशात चालू असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरांना मूठमाती देण्यासाठी जन्माला घातलेले रत्न होते. आपल्या विचारांनी, उपदेशाने महात्मा बसवेश्वरांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. तत्कालीन समाजव्यवस्थेला हे न पटल्यामुळे महात्मा बसवेश्वरांना खूप त्रास ही सहन करावा लागला. कर्मकांडाला मुठ माती देताना श्रमप्रतिष्ठा जपण्याचा संदेश महात्मा बसवेश्वरांनी दिला. स्वर्गाची संकल्पना मांडत असताना सदाचार हाच स्वर्ग आहे. असे त्यांनी सांगितले. गुण्यागोविंदाने, एकोप्याने वागल्यास हाच स्वर्ग आहे. असेही त्यांनी सांगितले. महात्मा बसवेश्वर यांची शिकवण सर्वांनी अंगीकारावी. एखादा धर्म गुरु किंवा धर्म संस्थापक म्हणून त्यांना चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करू नये. असे निवृत्तीराव सांगवे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन रवी जवळे यांनी केले.

About The Author