लातूरच्या रूग्णांना सुविधा पुरविण्यात राज्यशासन उदासिन – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूरच्या रूग्णांना सुविधा पुरविण्यात राज्यशासन उदासिन - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे रूग्ण 81668 झाले असून त्यापैकी 69351 रूग्ण उपचार घेवून परत गेले. यातील 1573 जणांचा आजपर्यंत मृत्यु झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. विशेषतः लातूर शहर व ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये व्हँन्टिलेटर बेड, ऑक्सीजन, रेमडेसेवीर इंजेक्शन व आरोग्य विभागाच्या कर्मचारी स्टाफचा तुटवडा आहे. अपुर्‍या सुविधामुळे अनेक रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या संदर्भात आरोग्यमंत्री ना.राजेंद्र शिंगणे, ना. अमितभैय्या देशमुख, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी लेखी निवेदन देवून पाठपुरावा करून मेडीसीन तुटवडा व कमतरतेची पुर्तता करण्यासाठी विनंती केली होती. परंतु पुरवठ्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. जिल्हाधिकार्‍यांनी कडक लॉकडाऊन केल्याने त्याचा परिणाम चांगला होऊन रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी त्या रूग्णांना सुविधा देण्यात राज्यशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देवून या गैरसोयी दुर कराव्यात, अशी मागणीही भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली.

रेमडेसेवीरचा काळा बाजार थांबवा जिल्ह्यामध्ये रेमडेसेवीर इंजेक्शन व इतर औषधांचा काळा बाजार भरमसाठ किंमती वाढवून होत आहे. तो त्वरीत थांबविला जावा व मागणीप्रमाणे रेमडेवीर इंजेक्शन व औषधांचा पुरवठा तात्काळ वाढवावा. अशी मागणीही माजी आ.कव्हेकरांनी केली.

ना.नितीन गडकरींचा आदर्श शासनकर्त्यांनी घ्यावा

केंद्रिय मंत्री ना.नितीन गडकरी हे स्वतः संपूर्ण विदर्भामध्ये जातीने लक्ष देवून अनेक ठिकाणी हवेतून ऑक्सीजन तयार करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभारण्याचे काम त्यांनी सुरू केलेले आहे. ऑक्सीजन व्हँन्टिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना टेस्टसाठी आरटीपीसीआर व्हॅन आणली आहे. एवढेच नाही तर निधी गोळा करून अडचणीत असलेल्या पेशंटला आर्थिक मदत केली जात आहे. या बरोबरच कोणाला अडचण पडल्यास मला आवाज द्या, असा विश्‍वास त्यांनी जनतेला दिला आहेे. अशाप्रकारे ना.राजेश टोपेही धाडसाने कार्य करून राज्याबरोबर जालण्यालाही आदी पुरवठा करीत आहेत. या सेवेची, कर्तबागारीची नोंद लातूरच्या शासनकर्त्यांनी काही प्रमाणात घेतली. मागणी पाठवा अशा सुचनाही दिल्या. त्यामुळे हे वर्तन बंद करून कोरोनाच्या काळात धाडसाने समर्पित भावनेने जनतेला आधार द्यावा, त्यांचे प्राण वाचवावे, असे आवाहनही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

About The Author