रस्ता सोडूनच पुढील काम करावे ; स्थानिकांकडून उपोषण व आत्मदहनचा इशारा… !
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन… !
अहमदपूर (प्रतिनिधी) : शहरातील चारटांगी येथील पुर्वीचा रस्ता व नाली बांधुन देण्यात येईल याची लेखी हमी देऊनच नगर परिषद अहमदपूर यांच्याकडून व्यापारी संकुल उभारण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली असुन उपोषण व आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की, स्थानिकांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कोर्ट रोड चारटांगी परिसरात नगर परषदेकडून व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे, स्थानिक नागरिकांसाठी पूर्वी असलेला रस्ता व नाली साठी जागा न सोडता त्या जागेवर दुकाने बांधण्यात येत असल्याचे निवेदन यापूर्वी दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते परंतु आता आमच्या घरासमोर रस्ता न सोडता दुकाने बांधण्याचे काम सुरू आहे.
अहमदपुर शहरा मधील निजाम कालीन विहीर चारटांगी येथे आहे व चारटांगी येथील सर्व नागरिकांचे घराचे दरवाजे विहीरीच्या बाजुने आहेत येथील सर्व नागरिकांचे येणे जाणे त्याच रस्त्याने आहे. विहीरीपासून ते अंबाजोगाई रोड पर्यंत नाली व रस्त्याचे काम करुन मिळावे अशी मागणी स्थानिक नागरीकांकडुन अनेक वर्षापासुन होत आहे.
नगर परिषदेचे तत्कालिन मुख्याधिकारी त्र्यबक कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी, व तहसिलदार, अहमदपुर यांच्या समक्ष सदरील सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करुन देण्याची तोंडी हमी दिली होती.
परंतु सदरील जागेवर नगर परिषद अहमदपुर यांच्याकडुन व्यापारी संकुलाचे शेड उभा करण्याचे काम चालु आहे तरी आम्ही संबंधित व्यापारी, स्थानीकांनी संकुलाचा नकाशा पाहिला त्या ठिकाणी आमच्यासाठी रस्ता न सोडता व्यापारी संकुल उभा करण्याचे प्रयत्न नगर परिषद अहमदपुर यांच्याकडुन होत आहे.
सदरील जागेमध्ये २५ ते ३० घरासाठी रस्ता न सोडता नगर परिषदेच्या वतीने होत असलेल्या अन्यायकारक कृत्य विरुध्द स्थानिक नागरीकांच्या वतीने लोकशाही मार्गाने विविध प्रकारच्या आंदोलने करण्यात येईल जर आम्हाला न्याय नाही भेटल्यास आम्ही सर्व आमरण म उपोषण व आत्मदहन करनार असा इशारा दिनांक 10 मे रोजी उपजिल्हाअधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.