भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत

अहमदपूर ( गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अहमदपुरात सत्कार करण्यात आला. गणेश हाके पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने बावनकुळे यांचा धनगर समाजाची पारंपारिक घोंगडी, काठी आणि पुष्पहार देऊन सत्कार केला.

याप्रसंगी भाजपाचे संघटन सरचिटणीस संजय कौडगे, माजी सभापती अशोकराव केंद्रे, प्रदेश प्रतिनिधी हेमंत गुट्टे, भाजपा तालुका अध्यक्ष हनुमंत देवकते, युवक नेते डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, दत्तात्रय जमालपुरे, परमेश्वर पाटील, तुकाराम मद्दे, कुलदीप हाके पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या प्रसंगी माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी सभापती अशोकराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष अॅड. भारत चामे, गोविंदराव गिरी, राहुल शिवपूजे, अॅड. अमित रेड्डी, अॅड. निखिल कासनाळे, अॅड. किशोर कोरे, युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, वैभव बल्लोरे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!