लाॅकडाऊनच्या सुचनांचा भंग, रिलायन्स स्मार्टला पन्नास हजाराचा दंड
रिलायन्स स्मार्ट याठिकाणी 50 कामगार एकत्रितरित्या काम करत असल्याने पन्नास हजाराचा दंड
लातूर (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोना विषाणू च्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशान्वये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरीही लातूर शहरातील औसा रोडवरील रिलायन्स मार्ट या ठिकाणी 50 कामगार एकत्रित काम करत आहेत, याची माहिती महापालिकेला मिळाली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त अमन मित्तल ,जिल्हा प्रशासन अधिकारी सतिश शिवणे यांच्या आदेशावरून विकेंड लाॅकडाऊन असताना औसा रोड वरील रिलायन्स स्मार्ट या ठिकाणी 50 कामगार एकत्रितरित्या काम करीत असल्याचे दिसून आल्या वरून महानगरपालिका व शिवाजी नगर पोलिस स्टेशन यांनी संयुक्त कार्यवाही करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. या वेळी झोनल अधिकारी संजय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलिस नाईक गोविंद चामे, काका साहेब बोचरे, राजकुमार हनमंते व महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक रवि शेंडगे, गजानन सुपेकर, दत्ता हनमंते उपस्थित होते.