1134 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

1134 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन 395 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 76208 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 395 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 977 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 186 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 1935 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 209 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84872 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6896 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1768 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 76208 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1134 आहे.

About The Author