लातूर जिल्हा बँकेचा वसुलीत नवीन उच्चांक

लातूर जिल्हा बँकेचा वसुलीत नवीन उच्चांक

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा नवा विक्रम; मार्च-२१ अखेर ९४.३५ टक्के वसुली

लातूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे राज्यात बिकट परिस्थिती उदभवली असतानाही कोविड नियमांचे काटेकोर पालन करून , लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्याचे माजी मंत्री,सहकार महर्षी तथा जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँकेने मार्च २१ अखेर बँक स्तरावर शेती कर्जाची ९४.३५ टक्के वसुली करून लातूर बँकेने नवीन उच्चांक प्रस्थापित केला असून राज्यातील जिल्हा बँकात अग्रस्थानी स्थानावर असलेल्या लातूर बँकेने शेतकरी सभासद यांना अत्याधुनिक सुविधा देत वसुलीत सुद्धा सातत्य कायम ठेवले आहे हे विशेष आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चालू हंगामात बँकेची ७४५ कोटी २५ लाख वसुलीस पात्र रक्कम आहे,त्यापैकी मार्च२१ अखेर बँकने ७०३ कोटी १७ लाख मुदलाची व ७ कोटी ७९ लाख व्याजाची वसुली केलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ९९.२२ टक्के वसुली करून रेणापूर तालुक्याने पहिला तर ,९८.१४ टक्के वसुली करून लातूर तालुक्याने दुसरा तर ९६.२७ टक्के वसुली करून जळकोट तालुक्याने तिसरा क्रमांक पटकवला असून जिल्ह्यांतील इतर ७ तालुक्यांतील वसुलीचे प्रमाण सरासरी ९१ टकेच्या पुढें आहे जिल्हा बँके मार्फत पतपुरवठा असलेल्या ५८४ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पैकी ३३४ सोसायट्यांनी बँक स्तरावर १०० टक्के वसुली दिलेली आहे तसेच २७ शेती कर्ज शाखाही बँक स्तरावर १०० वसूल झालेल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखानामार्फत जिल्हा बँकेस वसुलीसाठी विशेष सहकार्य झालेले असून, कारखान्यामार्फत लिंकिंगद्वारे रु.१०० कोटी पेक्षा जादा रकमेची वसुली झालेली आहे.

जिल्हा बँकेने कोरोनाच्या संकटांत कोविड १९ चे नियमाचे पालन करून, सामाजिक अंतर राखुन विक्रमी वसुली करून कायम सात्यत ठेवल्याबद्दल जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकारी, गटसचिव व बँकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांचे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब , बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ सन्माननीय संचालक मंडळ यांनी दि.३०.०४.२१ रोजीच्या संचालक मंडळ सभेत अभिनंदन करून, बँकस्तरावर १००टक्के वसुली दिलेल्या जिल्ह्यांतील सोसायटीचे चेअरमन व गटसचिव यांना खास करून अभिनंदन पत्र पाठवले आहेत.

About The Author