श्री शेषनाथ, अनाथांचा नाथ मालिकेत हावगीस्वामीच्या चार विद्यार्थ्यांची निवड

श्री शेषनाथ, अनाथांचा नाथ मालिकेत हावगीस्वामीच्या चार विद्यार्थ्यांची निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री शेषनाथ अनाथांचा नाथ या मालिकेसाठी श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली.श्री शेषनाथ महाराज यांच्या जीवन व कार्यावर आधारित पटकथा लेखक, दिग्दर्शक व निर्माता दत्ताजी उदगीरकर यांनी श्री शेषनाथ अनाथांचा नाथ या मालिकेची शूटिंग चे नियोजन करीत असून या मालिकेचे काही भाग देखील पूर्ण झालेले आहेत.

सदरील मालिकेत उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील चैतन्य जोशी बी.कॉम.एस.वाय.,सुमित आडे बी.कॉम.एस.वाय., सुप्रिया नळगिरे बी.कॉम.टी.वाय., नेहा करकीने बी.कॉम. टी. वाय.या चार कलावंत विद्यार्थ्यांची निवड झाली असून हे कलावंत मालिकेत अनुक्रमे बाबाराव, कोंडीबा, गोदावरी व पद्मिनीबाई या भूमिका समर्थपणे पार पाडत आहेत.

काही महिन्यातच ही मालिका ओटीटी किंवा मराठी चैनलवर आपणास पाहायला मिळेल. एक वर्षापूर्वी दत्ताजी उदगीरकर यांच्या उपस्थितीत चित्रपटाशी निगडित महाविद्यालयातील निबंध, वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली होती.

दिग्दर्शक दत्ताजी उदगीरकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांना संधी मिळाली. क्रेझी मॅड युनिव्हर्सल स्टुडिओ आणि चीप रंग फिल्म अँड एन्टरटे्नमेंट यांच्या सहयोगाने व या दोन प्रोडोकशनच्या माध्यमातून ही मालिका काढण्यात येत आहे.सदरील मालिकेसाठी नागेश स्वामी व शेषराव फावडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन होत आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मालिकेत निवड झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. यमेकर ,उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे,निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीतील डॉ.म.ई.तंगावार, प्रा.वसंत पवार, डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.धनराज बंडे, प्रा.जे.डी.संपाळे, प्रा.एन.आर.हाके, प्रा.मनोहर भालके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

About The Author