शहरातील घटना : कत्तीने गळा चिरून बायकोवर टाकले उकळते तेल!
चारित्र्याच्या संशयावरुन जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने केला बायकोचा निर्धूणपणे खून
अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरात चारित्र्याच्या संशयावरुन एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्या बायकोचा आधी कक्तीने गळा चिरुन आणि नंतर उकळते तेल तिच्या चेहऱ्यावर व विविध ठिकाणी अंगावर टाकून अत्यंत निर्घृणपणे तिचा खुन केल्याची घटना अहमदपूर शहरातील राजसारळी कॉलनीत शनिवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली. सकाळी दुध देण्यासाठी आलेल्या दुधवाल्याने दरवाजा ढकलल्यानंतर हॉलमध्ये पडलेला मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, निलंगा तालुक्यातील मुळचा रहिवासी असलेला वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी वय वर्ष (४३) हा २०११ साली परभणी जिल्ह्यातुन अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून बदलुन आला होता. तेंव्हा पासून तो अहमदपूर शहरातील टेंबुर्णी रोडवरील राजसारथी कॉलनीत पत्नी शामल वय वर्ष (३७), ११ वर्षांची एक आणि ९ वर्षांची एक अशा दोन मुलींसह वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी त्याने आपली मोठी मुलगी औरंगाबाद येथे
भावाकडे शिक्षणासाठी ठेवली होती. त्यामुळे सध्या घरात वैजनाथ, त्याची पत्नी शामल आणि ९ वर्षांची मुलगी असे तिघेच वास्तव्यास होते. वैजनाथ हा बायकोच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असत. पतीच्या सततच्या मारहानीमुळे त्याची पत्नी यापूर्वी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेली होती मात्र नातेवाईकांनी समजुत घातल्यानंतर ती परत आली होती. दरम्यान, शुक्रवारी (दि.१२) रात्री पत्नी शामल आणि मुलीचे जेवन झाल्यानंतर वैजनाथ याने लहान मुलीस मधल्या खोलीत झोपवले आणि पत्नी शामल आणि वैजनाथ हे हॉलमध्ये झोपले होते. रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास वैजनाथ याने अत्यंत शांत डोक्याने बायकोचा कत्तीने गळा चिरला आणि
उकळते तेल तिच्या पोटावर, पाठीत, चेहऱ्यावर, हातावर ठिकठिकाणी टाकून, कत्तीने तिचे मानेवर, गळ्यावर, पाठीत, हनुवटीवर, उजव्या हाताचे मनगटावर जबर वार करून जाळण्याचा प्रयत्न केला. यात शामल यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येताच तो घराचा दरवाजा पुढे करुन फरार झाला. पहाटे दुधवाला दुध घेवून घरी आला आणि त्याने आवाज दिला परंतु, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने दरवाजा ढकलताच हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शामल यांचा मृतदेह दिसला. याची कल्पना पोलिसांना दिल्यानंतर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. घटनेची माहिती मिळताच
घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम , प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, सहा-पो निरिक्षक विठ्ठल दुरपडे पोलीस उपनिरिक्षक अंधोरीकर आदींनी भेट दिली
मयत शामल यांचा भाऊ मनोज प्रभाकर ढोले (वय २४, रा. श्रीमाळी ता. भालकी, जि. बिदर) याने वैजनाथ सूर्यवंशी याच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली असुन या तक्रारीच्या आधारे अहमदपूर पोलिसांत गूरनं 279/2023 कलम 302 भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार असलेल्या आरोपीचा शोध अहमदपूर पोलीस घेत आहे पुढील तपास व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अंधोरीकर करीत आहेत