केंद्रेवाडीत मंदिराचा जीर्णोद्धार व कलशरोहण सोहळ्याचे आयोजन

केंद्रेवाडीत मंदिराचा जीर्णोद्धार व कलशरोहण सोहळ्याचे आयोजन

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील सैनिकाची केंद्रेवाडी येथे सर्व गावकऱ्यांच्यावतीने हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शुक्रवार (दि १३) ते शनिवारी (दि २०) दरम्यान आयोजित केले आहे. सोहळ्याची सांगत शनिवारी दुपारी चंद्रकांत महाराज खळेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. या सोहळ्यात हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा तर गुणवंत केंद्रे गुरुजी यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी प्रवचन सुरु आहे. या सप्ताहात शनिवारी रात्री अशोक महाराज शाखी अहमदनगर यांचे किर्तन झाले.

रविवारी रात्री सुदाम महाराज पानेगाव आळंदी, सोमवारी रात्री अर्जुन महाराज लाड गुरुजी, मंगळवारी रात्री सोनाली करपे चकलंबा गेवराई, बुधवारी सायंकाळी तुकाराम शास्त्री शुक्लेश्वर आणि रात्री बाळासाहेब महाराज चोपदार आळंदी, गुरुवारी रात्री केशव महाराज उखळीकर, शुक्रवारी रात्री अमृताश्रम महाराज जोशी बीड यांचे अनुक्रमे किर्तन होणार आहेत. या सोहळ्याची सांगत शनिवारी दुपारी चंद्रकांत महाराज खळेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.सोमवार दि १५ मे रोजी विजयानंद महाराज सुपेकर व बापूदेव महाराज बेलगावकर यांच्या हस्ते दुपारी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व कलश स्थापना करण्यात येणार आहे.दि २० मे रोजी सकाळी भागवत ग्रंथाची भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सप्ताहात दि १९ मे रोजी गोदावरी मुंडे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि १६ मे रोजी महिला यांचा जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात हभप भरत पठाडे, कृष्णा महाराज भोरकडे, महादेव महाराज दराडे, कैलास महाराज पवार, व्यंकटेश फड, गोविंद कांदे, संतोष डोंगरे, निलेश केंद्रे बाळासाहेब गुट्टे, उद्धव फड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

About The Author