हेळंब येथे एकास मागील वादाच्या कारणावरून मारहान; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील हेळंब येथे एकास मागच्या वर्षी केस का केला होतास? म्हणून हॉटेल मध्ये चहा पिताना फिर्यादी माधव उमाकांत बीजापूरे याला चौघांनी मारहाण केली. मारहाण करणाऱ्या चौघा विरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.देवणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी माधव बीजापुरे (वय ४० राहणार हेळंब) हा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.तो एका हॉटेल वर चहा पित असताना त्याचे मामा व्यंकट दंडवते,हणमंत दंडवते व मामाची मुले तायप्पा दंडवते व गोपाळ दंडवते (सर्व राहणार हेळंब) या चौघांनी संगनमत करून गेल्यावर्षी आमच्यावर केस का केली? म्हणून व तसेच निवडणुक व फ्लॅटच्या कारणावरून तुझा माज उतरवतो म्हणून तायप्पा दंडवते व तात्याराव दंडवते यांनी काटीने पाटीत ,डोक्यात व तात्याराव दंडवते व व्यंकट दंडवते यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस जखमी केले व खिशातील एक हजार पाचशे रुपये हिसकावून घेऊन, तू जर नंतर असेच केलास तर तुझ्या पूर्ण खानदानला खतम करून टाकतो.अशी जीवे मारण्याची धमकी दिली.ते चार आरोपी आडदांड प्रवृत्तीचे असून ते काय करतील सांगता येत नाही, असे फिर्यादीने सांगितले आहे.त्या चौघांविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात कलम ३२७,३२४,३२३,५०४,५०६,
३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस नाईक ज्ञानोबा किवंडे हे करीत आहेत.