समाजसेवा आणि विकासाची सांगड घालणारा नेता म्हणजे आ. प्रभू चव्हाण – अंकुश वाडीकर
उदगीर (एल. पी.उगीले) कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आल्याने अनेक मान्यवरांचा पराभव झाला. मात्र सामाजिक जाणीव जपून विकास आणि दांडगा जनसंपर्क याची सांगड घालणारा लोकप्रिय नेता आ. प्रभू चव्हाण चौथ्यांदा भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत. ते एकटेच विजयी झाले नाहीत तर, बिदर जिल्ह्यामध्ये इतरही आणखी भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचार सभांचे आयोजन केले होते. जनसामान्यांचा जनसेवक, जननायक अशा शब्दात प्रभू चव्हाण यांचा उल्लेख केला जातो. अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजपाचे सीमावर्ती भागातील युवा नेते अंकुश वाडीकर यांनी सांगितले.
गोरगरिबांचे कामे करणारा आणि वाडी तांड्यावर जाऊन मतदारांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता आम्हाला हवा आहे. अशा पद्धतीची भूमिका मतदारांनी घेतली आणि सहज उपलब्ध होणारा, जनता जनार्दन हेच परमेश्वराचे रूप आहे. असे समजून जनतेची सेवा करणारा, समाजाचा विकास घडावा म्हणून धडपडणारा नेता म्हणजे प्रभू चव्हाण होय. असेही याप्रसंगी वाडीकर यांनी सांगितले.
जनता अत्यंत हुशार आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून प्रभुजी चव्हाण यांनी उत्कृष्ट कार्य केले असले तरीही मंत्रीपद आले की, कार्यकर्त्यांच्या आशा अपेक्षा वाढतात. प्रत्येकाची आशा अपेक्षा पूर्ण करण्याने शक्य होत नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये अपप्रचार करणाऱ्यांना संधी मिळते. तसाही प्रकार औराद विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. मात्र आपल्या अडीअडचणीच्या वेळी सहज उपलब्ध होणारा आणि गोरगरिबाबद्दल तळमळ असणारा नेता म्हणून जनतेने प्रभू चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजय केले आहे. गेल्या पंधरा वर्षात या विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाचे प्रकल्प आले आहेत. भविष्यातील विकासाची गंगा अशीच चालू राहील, असा विश्वासही अंकुश वाडीकर यांनी बोलून दाखवला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मतदार संघातील गावोगावी जाऊन आ. प्रभू चव्हाण मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आभार व्यक्त करत आहेत. याप्रसंगी गंगनबीड परिसरातील जनतेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला. त्या अनुषंगाने वाडीकर बोलत होते.