अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने तीन दिवशीय जिल्हा समिती क्षमता बांधणी शिबीर संपन्न

अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने तीन दिवशीय जिल्हा समिती क्षमता बांधणी शिबीर संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र लातूरच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या युवकांचे प्रक्रियेमध्ये लातूर येथील अफार्म ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी जिल्हा समिती बांधणी पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक व पश्चिम उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक दीपक देवरे यांनी केले. तसेच युवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या तीन दिवसीय शिबिरामध्ये अनुभव शिक्षा केंद्राची प्रक्रिया ,त्याची ओळख व ध्येय धोरण ठरवण्यात आले. त्यामध्ये शैक्षणिक, राजकीय ,आर्थिक तसेच सामाजिक क्षेत्र व युवकाची भूमिका, युवकांनी कशी पुढे घेऊन जायला पाहिजे? व गाव पातळीवर असलेल्या संसाधनांचा उपयोग करून प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग नोंदवणे व प्रशासनासोबत समन्वय साधून गाव पातळीवरती असलेल्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेतृत्व कौशल्य गुण व संवाद कौशल्य असे या सर्व बाबी युवकांनी आत्मसात करून समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, धार्मिक तेढ, जातीय समीकरण या गोष्टीला आळा घालून एक माणूस म्हणून जगण्यासाठी आपन संविधानिक मूल्य अंगीकारले पाहिजे. आणि समाजामध्ये माणुसकीचे बीज निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी हे तीन दिवशी शिबिरामध्ये संबंध लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका ,देवणी तालुका व तसेच चाकूर या तालुक्यातील छोट्या छोट्या गावातून युवकांचा सहभाग नोंदवला आहे.या प्रशिक्षणाचे आयोजन अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक महादेव कोटे व तालुका कार्यवाह ईश्वर पाटील, तालुका संघटक महेश काळे, अनुभव शिक्षा केंद्रासोबत जोडून असलेले युवक अमर पुंजारे , जय सह्याद्री,अजय सुरवसे ,विक्रम गायकवाड ,विकास बिरादार ,शिवकुमार स्वामी, वैभव मैत्रे ,सिद्धेश्वर मिरचे, अच्युत जोशी ,अरुण पाटील, विशाल फुलारी ,आदित्य तेलंगे आदींनी केले आहे.

About The Author