किनीयाल्लादेवी येथे प्रवीण मेंगशेट्टी यांचा सत्कार संपन्न

किनीयाल्लादेवी येथे प्रवीण मेंगशेट्टी यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील, किणी यल्लादेवी येथे उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांची पुणे येथे बदली झाल्यामुळे निरोप समारंभाचे निमित्त करून किनीयल्लादेवी येथे ग्रामस्थ आणि मलशेट्टे परिवाराच्यावतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कीर्तीकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रामेश्वर गोरे, सेवानिवृत्त अभियंता वैजनाथ व्हणाळे, पुणे येथील सुनील नांदेडकर, अभियंता पंकज व्हनाळे, बाबुराव तरगुडे, विलास बिरादार, सोपान रोडगे, शिवराज येरनाळे, गणपत हाळे, सहदेव व्हनाळे, राजकुमार बिरादार बामणीकर, शिवकुमार सोनटक्के, रमाकांत चवळे आणि मलशेट्टे परिवारावर प्रेम करणारे उदगीर पंचक्रोशीतील स्नेही जन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी कोरोना काळात अत्यंत दक्षपणे कर्तव्य बजावल्याबद्दल आणि त्या काळात वैद्यकीय सेवा कुठेही कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेतल्याबद्दल तसेच स्वतःला कोरोना झाला असताना शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन जनसामान्यांमध्ये शासकीय सेवेबद्दल विश्वास निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले होते. तसेच एक जनसेवक म्हणून सर्वसामान्य माणसासाठी ही त्यांनी मोठे योगदान दिले. वरिष्ठ अधिकारी असताना देखील सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून राहणे हा त्यांचा स्वभाव उल्लेखनीय असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले. त्याबद्दल परिसरातील नागरिकांनी मिळून हा निरोप समारंभ आयोजित केला होता. अशा पद्धतीने गावोगावी निरोपाचे कार्यक्रम अपवादात्मक प्रशासनातील अधिकाऱ्यांचे होत असतात, अशी चर्चा उदगीर तालुक्यात चालू आहे.

About The Author