जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
दोन हजार रुपयांसाठी बँकेत तोबा गर्दी
अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या महाराष्ट्रात तसेच लातुर जिल्ह्यात कोरोना संगर्गजन्य रोगाने थैमान घातले असुन रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाच्या वतीने १ जुन पर्यंत कडक निर्बंधासह लॉक डाऊन घोषीत केला आहे परंतु सदरील लॉक डाऊन नागरीक गांभीर्याने घेताना दिसुन येत नाहीत दोन हजार रूपयांसाठी शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत बँकेत तोबा गर्दी करीत आहेत.
.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचे वर्षात तीन हप्ते याप्रमाणे सहा हजार रुपये अर्थसाहाय्य लागू केले आहे. चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर येताच शेतकऱ्यांनी दोन हजार रुपयांसाठी बँकेत तोबा गर्दी केली आहे. मागील आठवडाभर बँका बंद होत्या सोमवारपासून बँकेचे कामकाज सुरू होताच पंतप्रधान किसान सन्मान निधी चे दोन हजार रुपये घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अहमदपूर शाखेत शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केल्याने सोशल डिस्टींग क्षणचा फज्जा उडाला आहे. लाॅक डाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. तसेच वाढत्या महागाईमुळे आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. खरीप पेरणीचे दिवस तोंडावर आले असल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतकरी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे विदारक चित्र दोन दिवसापासून पहावयास मिळत आहे. कोरोणा संकट काळात लोकांनी धीर धरावा व गर्दी न करता पैसे उचलावेत म्हणून अहमदपूर येथील पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी तर पोलिस बंदोबस्त लावला तरी लोक नियमांचे पालन करीत नाहीत ही बाब चिंताजनक आहे.