महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे – राज्यव्यापी आक्रोश आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली आरक्षण हक्क कृती समिती व स्वतंत्र मजदूर युनियन च्या आदेश व निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आक्रोश आंदोलना च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटनेच्या वतीनेही तहसिलदार अहमदपूर यांना
1.मागासवर्गीयांचे पदोन्नती मधिल 33% आरक्षण रद्द करणारा दि. 07 मे 2021 रोजीचा शासन निर्णय असंविधानीक व बेकायदेशीर असल्याने तात्काळ रद्द करणे
- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित याचिकामधील अंतिम निर्णयाचे अधीन राहून कोट्यातील पदोन्नतीची 33% रिक्त पदे बिंदूनमावलीनुसार भरण्यात यावे
यावेळी कोविड चे सर्व नियमांचे पालन करून आक्रोश आंदोलना संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सद्स्य श्री बालाजी कांबळे यांनी निवेदन दिले.