लातूर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 534
नवीन 531 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 80471 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 531 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1307 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 177 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 2753 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 354 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 86985 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4596 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1918 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 80471 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 534 आहे.