राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य सामाजिक योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील तीन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
चाकूर (गोविंद काळे) : तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य सामाजिक योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील तीन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप चाकुर- अहमदपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले..
चाकूर तालुक्यातील जाधव राधाताई परमेश्वर रा.अंबुलगा, राठोड कविताताई शंकर रा. सेवापुर तांडा (आष्टा), शिंदे ज्योतीताई मधुकर रा सुगाव यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
यावेळी तहसीलदार डॉ.शिवानंदजी बिडवे,तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजीराव काळे,युवा नेते सुरज भैय्या पाटील,अनिलराव वाडकर,भीम पाटील,संजय गांधी निराधार समिती सदस्य गणेश सिंदाळकर,बापूसाहेब वाघमारे,सह आदी मान्यवर उपस्थित होते.