पंडीत सुकणीकर यांच्या कार्याचा आ. निलंगेकर यांच्याकडून गौरव

पंडीत सुकणीकर यांच्या कार्याचा आ. निलंगेकर यांच्याकडून गौरव

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पंडितराव सुकणीकर यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा आवाका पूर्ण जिल्हाभर आहे. त्यांचा आदर्श इतर पदाधिकाऱ्यांनी घ्यावा. अत्यंत तळमळीने विविध संस्थांकडून लातूर जिल्ह्यासाठी त्यांनी अनेक वेळा सहकार्य मिळवून दिलेले आहे.

 विशेषतः ऑक्सफाम इंडिया यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला 2 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट,  20 बेड, 250 नोझल मास्क, आयसीयु कक्षासाठी आवश्यक असणारे चार मॉनिटर, 125 थर्मामीटर, सहा बीपी मीटर, 15 आॅक्सीमीटर, 20 ऑक्सिजन फ्लो मीटर इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या वस्तू त्यांनी दिल्या आहेत. प्रा. पंडितराव सुकणीकर यांच्या बद्दल बोलताना, आ. संभाजी भैय्या निलंगेकर यांनी सांगितले की, पंडितजी सुकणीकर हे अत्यंत तळमळीने कार्य करत असून त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी तिसऱ्यांदा हे सहकार्य मिळवून दिले आहे. तसेच अजूनही सहकार्य मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. लातूर जिल्ह्यासाठी त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढले.

 पंडित सुकणीकर यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाला सहा लाख 75 हजारांचे साहित्य ऑक्सफाम इंडिया या सेवाभावी संस्थेकडून देण्यात आले. याप्रसंगी माजी पालकमंत्री आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुलभैया केंद्रे, भाजपाचे नेते दगडुजी साळुंखे, ऑक्सफाम इंडियाचे प्रकल्प अधिकारी परमेश्वर पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित सुकणीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी परगे, सिव्हिल सर्जन देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पंडितराव सुकणीकर यांनी यापूर्वीहु उदगीर तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सॅनिटायझर, मास्क यांचे मोफत वाटप केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव जनसामान्यातून होत आहे.

About The Author