शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना आक्रमक
उदगीर (अॅड.एल. पी. उगिले) : सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असून पेरणीपूर्व मशागतीची पूर्ण झाल्या आहेत. आता बी- बियाणे आणि खत खरेदी करण्याचा काळ आहे. गेल्यावर्षी बोगस आणि बनावट सोयाबीन बियाणा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले होते. तसेच महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एका बाजूला शेतीमालाला भाव कमी तर त्यात व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची होणारी लूट, त्यामुळे शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
खताच्या किमती कमी केल्या असल्या तरी खताचा जो जुना साठा होता, तो साठा कमी किमतीमध्ये अर्थात जुन्या किमती मधेच विकला जावा. अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच खत आणि बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची लूट झाल्यास व्यापाऱ्यांची गय करणार नाही. असा इशाराही शिवसेनेच्या वतीने दिला आहे. यासंदर्भात उदगीर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी त्यांना स्वतंत्रपणे निवेदन देऊन आपल्या मागण्या नमूद केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेती अवजारे, बी बियाणे, कृषी सेवा केंद्र या सर्वांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साठा आणि त्यांचा भाव फलक दर्शनी ठिकाणी लावावा. भाव फलक स्पष्ट असावे तसेच प्रत्येक खत विक्रेत्यांनी जुना स्टॉप किती आहे? त्याचे आॅडिट करून घ्यावे. रोजच्या रोज खत, बियाणे विक्री आणि शिल्लक स्टॉक दर्शनी भागात लावावा. स्विप मशीनचा वापर करावा. शासनाच्या नियमाप्रमाणे खत विक्री केली जावी. जास्त दराने खत विक्री केल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कृषी सेवा केंद्र आणि शेतीविषयक साहित्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करू नये. अन्यथा त्यांना धडा शिकवला जाईल. असाही इशारा सदरील निवेदनात देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, विधानसभा संघटक श्रीमंत सोनाळे, नवी मुंबईचे विभाग प्रमुख आकाश बिरादार, माजी शहरप्रमुख कैलास पाटील, ब्रह्मजी केंद्रे, शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव सचिन साबणे, तालुका संघटक अरुण बिरादार, शहर संघटक सचिन बिरादार, महिला आघाडीच्या अरुणा लेंडाणे, उपतालुका प्रमुख रामदास काकडे, शहर प्रमुख विकी गवारे, विष्णू चींतलवार, अनिल मोरे, व्यंकट साबणे, अर्जुन आटोळकर इत्यादी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.