विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासह विविध कौशल्य आत्मसात करावे– डॉ मल्लिकार्जुन करजगी

विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासह विविध कौशल्य आत्मसात करावे-- डॉ मल्लिकार्जुन करजगी

उदगीर(एल.पी.उगीले)- शिक्षण क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा झालेली आहे.जो विद्यार्थी मेहनत करेल तोच या ठिकाणी टिकून राहू शकतो. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांना वाव दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासह विविध कौशल्य आत्मसात केले पाहिजेत असे उद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा डॉ मल्लिकार्जुन करजगी यांनी काढले. येथील शिवाजी महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शिवाजी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समारंभाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर, प्रमुख उपस्थिती ज्ञानदेव झोडगे सचिव किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर, कोषाध्यक्ष नामदेव चामले, सहसचिव माधवराव पाटील, संचालक पृथ्वीराज पाटील एकंबेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. ए एम नवले. उपप्राचार्य डॉ. एस व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ समितीचे सदस्य सचिव डॉ ह वा कुलकर्णी यांची होती. पुढे बोलताना करजगी म्हणाले आजचे विद्यार्थी विविध कलागुणाने संपन्न झालेले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये ते आपलं नावलौकिक करत आहेत. शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही अनेक क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक केलेला आहे. यापुढेही असाच नावलौकिक त्यांनी करावा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रवेशद्वारापासून मिरवणुकीने करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत घेण्यात आले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ ए एम नवले यांनी मनोगतून महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. महाविद्यालयामध्ये विविध कार्य कशाप्रकारे झाले याबद्दलची माहिती दिली .अध्यक्षीय समारोपप्रसंगी अध्यक्षाच्या वतीने सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्याप्रसंगी ते म्हणाले पदवीदान म्हणजे पदवी दान देण्याची नसून विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून मिळविलेले बाब आहे. त्यांच्या कष्टाचे ते फळ आहे. त्यांनी ते स्वतः प्राप्त केलेले आहे. त्यामुळे पदवीदान नसून पदवी वितरण म्हणावे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ ह वा कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन सौ एस एस पावडे यांनी तर आभार प्रा बी पी सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली तसेच मिरवणुकी द्वारे प्रवेशद्वारा पर्यंत पाहुण्याला सोडून कार्यक्रमाचे विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समिती, पदवी वितरण नियोजन समिती, विद्यार्थी,पालक, पत्रकार ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author