व्हाईस आफ मिडीयाच्या मागणीला श्रमीक क्रांती आभियानचा पाठिंबा

व्हाईस आफ मिडीयाच्या मागणीला श्रमीक क्रांती आभियानचा पाठिंबा

देवणी (प्रतिनिधी) : व्हाईस आप मिडिया शाखा देवणी व उदगीरच्या वतीने तहसिल कार्यालय देवणी व तहसिल कार्यालय उदगीर येथे विविध मागण्या साठी धरणे धरुन निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात पत्रकारांच्या विकास व कल्याणासाठी महामंडळ स्थापन करुन त्या महामंडळाला भरीव मदत करण्यात यावी, पत्रकारितेत पाच वर्ष पुर्ण झालेल्या पत्रकाराना आधिस्विकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्राच्या जाहिरातीसाठी लागु आसलेली जी.एस.टी.कर आकारणी रदद् करण्यात यावी,पत्रकार कुटुंबियांच्या रहाण्याच्या जागेच्या प्रयोजनेकरिता भुखंड देण्यात यावे, कोरोनात जीव गमविलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा. व त्यानुसार मयत कुटुंबियाचे पुनर्वसन करण्या यावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांच्यासाठी मारक आहे,लघु दैनिकांनाही माध्यम (ब वर्ग) दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. आशा मागण्या सदरच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यांच्या या मागण्याला श्रमीक क्रांती आभियान महाराष्ट्र, या संघटनेच्या वतीने जाहिर पांठिंबा देण्यात आला आहे.पांठिंबा संबधीचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसिलदार उदगीर यांना देण्यात आले,सदरच्या मागण्या रास्त आसुन महत्वपुर्ण आहेत. यांच्या या मागण्याला श्रमीक क्रांती आभियान,महाराष्ट्र जाहिर पाठिंबा देत आहे, अशी माहीती निवेदनाव्दारे कळलविण्यात आली आसुन लोकशाहिच्या चौथ्या स्थंभाला आर्थात प्रसिध्दी माध्यमांना सदृढ व मजबुत बनविण्याकामी त्यांच्या निवेदनाचा सहानुभुती पुर्वक विचार केला जावा, या मागण्या तत्काळ पुर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेचे प्रमुख मारुती गुंडीले, गोविंद शिंदे,बाळु उर्फ श्रीकांत सुर्यवंशी,बालाजी आदावळे,,संजय बलांडे, यांनी निवेनाव्दारे केली आहे.

About The Author