पुणे एसीबी च्या वतीने जालना येथे सापळा, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी जाळ्यात

पुणे एसीबी च्या वतीने जालना येथे सापळा, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी जाळ्यात

पुणे (रफिक शेख) : मराठवाड्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या जालना येथे एका व्यक्तीला त्याच्यावर  अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या अर्थात ॲट्रॉसिटी गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, सुधिर अशोक खिराडकर आणि पोना संतोष निरंजन अंभोरे ,पोका विठ्ठल पुंजाराम खार्डे यांनी तक्रारदार यांच्याकडून त्याला अट्रोसिटी गुन्ह्यात सहकार्य करतो. म्हणून पाच लाखाची लाच मागणी केली होती. तडजोडी अंती ती रक्कम तीन लाखावर निश्चित झाली. लाच प्रकरणाला प्रोत्साहन देऊन दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी क्रमांक दोन त्याने स्वतः लाच स्वीकारली, त्यास पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने रंगेहात पकडले.

 पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक श्रीमती वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षिरसागर, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोका किरण चिमटे, दिनेश माने इत्यादींचा समावेश होता. या पथकांस पुणे विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी मार्गदर्शन केले. पुणे विभागाने मराठवाड्यात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना कारवाई केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कौतुक केले जात आहे.

About The Author