अहमदपूरात पोलिस स्टेशन व न.प. च्या वतीने कारवाई, एकुण 24300 दंड वसुल
अहमदपूर ( गोविंद काळे ) : अहमदपूर पोलिस स्टेशन व नगरपरिषदेच्या वतीने विनाकारण फिरणारे, बिना मास्क, तसेच वाहनावर कारवाई करुन एकुण 24300 रुपये दंड वसुल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर पोलिस स्टेशन व नगर परिषदेच्या वतीने संयुक्त कारवाई करुन बिना मास्क फिरणारे, व इतर वाहनावर कारवाई करुन एकुण 24300 रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात व कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस स्टेशन व नगर परिषदेने दि, 21 रोजी अहमदपूर येथे शिवाजी चौकात कारवाई केली यामध्ये पोलिस स्टेशन अहमदपूरच्या वतीने मोटार व्हेईकल अॅक्ट नुसार 6300 रुपये दंड वसू करण्यात आला. नगर परिषद अहमदपूरच्या वतीने विना मास्क च्या 34 केसेस करून 17000 हजार रुपये दंड वसूल केला गेला व आस्थापना चे 1 केस करुन 1000 रुपये दंड वसुल केला. यावेळी पोलिसांच्या कारवाईत एकुण 69 मोटारसायक ताब्यात घोण्यात आल्या व 10 कार तसेच 02 अॅटो रिक्क्षा असे एकुण 81 वाहन ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने रात्र-दिवस अविरत कार्य चालु आहे. वेळोवेळी सुचना देवूनही काही नागरीक नियमांचे पालन करीत नाहीत. संपुर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागली असुन शासनाच्या वतीने कडक निर्देश देण्यात येवून सुद्धा नागरिक बिनधास्त बिना मास्कचे फिरताना दिसत आहेत. दि. 21 मे 2021 रोजी पोलीस स्टेशन अहमदपूर व नगर परिषद अहमदपूर च्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या झालेल्या कारवाईत 24300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची मोहीम उप विभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजीले, यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षाक या यांच्या नेतृत्वात केली गेली. सदर कार्यवाही मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, नागोराव जाधव, एकनाथ डक, पोलीस हवालदार सुहास बेंबडे, कैलास चौधरी, भगवान गिरी, केंद्रे, दिघोळे, साधी स्टाफ व नगरपालिका अहमदपूरचे पानपट्टे इत्यादी कर्मचारी हजर होते. सदरच्या कारवाईमुळे विनाकारण फिरणार्यांना चांगलाच जरब बसला असुन दुपारच्या वेळी विनाकारण भटकरणार्यांची संख्या कमी झालेली दिसत होती.