लातूर जिल्ह्यात 428 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
नवीन 299 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 80899 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 299 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1031 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 148 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 2153 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 151 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 87218 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4375 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1944 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 80899 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 428 आहे.