विजेचा धक्का लागून महावितरणचा रोजंदारी कर्मचाऱ्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागून महावितरणचा रोजंदारी कर्मचाऱ्याचा मृत्यू

महावितरण कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ व ऑपरेटर गुन्हा दाखल

चोवीस तासानंतर मृत देह घेतला ताब्यात

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील लांजी येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या एका तरुणाचा विजेचा धक्का लागून पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला असुन मृत्यूस कारणीभूत असलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यासाठी नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालय येथे आंदोलन केले गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल चोवीस तासानंतर प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील लांजी येथे अनिल पंढरी गायकवाड वय 24 वर्ष हा महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत रोजंदारी ने काम करतो सदर लांजी या ठिकाणी सत्य भामा जाधव या वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत शनिवारी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान लांजी तांबट सांगवी 11 के व्ही लाईनवर फॉल्ट असल्याचे समजतात परमिट काढून व लाईन मॅन च्या परवानगीने युवक पोलवर गेला होता मात्र त्याठिकाणी क्रॉसिंग आहे का नाही हे लक्षात न आल्याने त्याला विजेचा धक्का लागून खाली पडला व जागेवर त्याचा मृत्यू झाला सदर घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून ठेवला जोपर्यंत संबंधित महावितरणाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम न करण्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला त्यानंतर रविवारी दुपारी 4 वा पोस्टमार्टम करण्यात आले महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही आल्यानंतर नातेवाईकांच्या मागणी प्रमाणे मयताचे मामा भालेराव राजेंद्र निवृत्ती यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ तंत्रज्ञ सत्यभामा जाधव ऑपरेटर शाम गंगथंडे कनिष्ठ अभियंता गणेश कांबळे यांच्याविरुद्ध कलम 304 व 34 नुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर युवकावर लांजी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागोराव जाधव करत आहेत.

About The Author