साईबाबा शुगरच्या आर्थिक व मानसिक त्रासास कंटाळुन ११ शेतकऱ्यांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील शिंदगी(बु) येथील ११ शेतकऱ्यांनी साईबाबा शुगर लिमिटेड शिवनी ता औसा जि लातुर येथे गेल्या सहा महिन्यापुर्वी गळीत हंगाम 2O20 रोजी गाळपास घातलेल्या उसाचे 21 लाख रू अद्याप दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दि O2 जुन रोजी सामुहिक जलसमाधीचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
तालुक्यातील सिंदगी(बु) येथील आम्ही ११ शेतकऱ्यांनी 21 लाख रूपयेचा ऊस गळीत हंगाम 2O20 रोजी जवळपास सहा महीन्यापुर्वी साईबाबा शुगर लि साखर कारखाना शिवनी ता औसा जि लातुर येथे आपल्या शेतातील ऊस गाळपासाठी दिला होता व पंधरा दिवसात तुमच्या उसाचे पैसे देऊन टाकुत असे आश्वासन कारखान्यामार्फत देण्यात आले होते . त्यानूसार वजनप्रमाणे चेकसुद्धा कारखान्यामार्फत देण्यात आले आहेत संबंधित चेक आम्ही बँकेत लावले असता रक्कम शिल्लक नसल्यामुळे सदरील आमचे चेक परत आले . सदरील प्रकरणी आम्ही कारखान्याकडे चौकशी केली असता आठ पंधरा दिवसात तुमचे पैसे देऊन टाकुत असे आश्वासन मागील चार महिन्यापासून देत आहेत . सदरील प्रकरणी आम्ही मा.जिल्हाधिकारी लातूर , मा.तहसिलदार औसा , मा.तहसिलदार अहमदपूर यांना मागील तीन महिन्यापासून कळवुनही आम्हा शेतकऱ्यांची प्रशासन दखल घेत नाही.
सध्याच्या कोरोना सदृश परिस्थितीतून जात असताना आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे . आमच्यातील काही शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न व्याजी व उसनवारी पैसे काढुन मार्गी लावावे लागणार आहेत .आठ दिवसात येणाऱ्या पेरणीसाठी पैसे कोठुन आणायचे हा सतत चिंतेचा प्रश्न आम्हा शेकांना भेडसावत आहे . तरी वरील प्रकरणी दखल न घेणाऱ्या प्रशासनाच्या व साखर कारखान्याच्या मानसिक व आर्थिक त्रास्वला कंटाळुन आम्ही शेतकरी दि .02 / 06 / 2021 या रोजी मोघा साठवण तलाव ता.अहमदपूर येथे सामूहिक जलसमाधी घेणार आहोत . आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास आमच्या मृत्युस कारणीभूत जिल्हा प्रशासन व साईबाबा शुगरचे कार्यकारी संचालक राजेश्वर बुके , स्वप्निल बुके , स्वप्निल कुलकर्णी व चेतन ढोले हे राहतील असे निवेदन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना सामाजिक कार्यकर्ते शंकर मुळे यांच्यासह संबंधीत शेतकऱ्यांनी दिले असुन सदरील निवेदनावर शेतकरी सहदेव थावरे, दशरथ थावरे, तुळशीराम थावरे, माधव थावरे, मालु थावरे, बळीराम थावरे, तुकाराम मुळे, ज्ञानोबा मुळे, विनायक मुळे, अमोल मुळे, व्यंकट मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत