पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घरातच साजरी करा – गणेश दादा हाके
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येत्या ३१ मे रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे.गेल्या वर्षीचा अपवाद वगळता अहिल्यादेवींची जयंती भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते,अजूनही महाराष्ट्र मध्ये कोरोना कमी झाला नसल्याने या वर्षीची जयंती कोरोणाचे सर्व नियम पाळून घरातच साजरी करण्याचे आवाहन भाजपा प्रदेश पॅनेलिस्ट गणेश दादा हाके यांनी केले आहे.
मराठे शाहीच्या सुवर्णकाळातील एक आदर्श राज्यकर्ती शिवरायांच्या विचारांच्या वारस,प्रजेसाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्याला पणाला लावणारी व प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारी सलग २९ वर्ष होळकरांच्या गादीचा कारभार पहाणारी आदर्श प्रशासक,लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती अहिल्यादेवींच्या प्रतिमेला शोभेल अशीच करावी.प्रत्येकांनी ३१ मेच्या पूर्व संध्येला म्हणजे ३० मे रोजी रात्री अंगणात गॅलरीत दिवे पणत्या लावा.घरावर रोषणाई करा.३१ मे रोजी सकाळी अंगणात दारावर समोर सुंदर रांगोळी काढा,दारावर तोरण बांधा,घरावर होळकर शाहीचे निशाण फडकावा अथवा पिवळा झेंडा फडकावा,मातेच्या प्रतिमेचे सहकुटुंब पूजन करा,घरातील लहान थोरांना अहिल्यादेवींचे चरित्र सांगा,घरात अहिल्यादेवींचे गौरवगीत मधुर व मंजुळ स्वरात लावा,आजूबाजूच्या सर्वांना आपल्याकडे सण आहे असं मंगलमय वातावरण निर्माण करा,नवीन वस्त्र परिधान करा,अशा मंगलमय वातावरणात गोड धोड पक्वानाचा आस्वाद घ्या,घरात दिवसभर प्रसन्न व आनंदी वातावरण ठेवण्यासाठी भजन,गीत,गायन,मंगल वाद्य वाजवून मातेची जयंती साजरी करा,दिवसभर घरातच राहा व अहिल्या मातेचा जन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करा असे आवाहन भाजपा प्रदेश पॅनेलिस्ट गणेशदादा हाके यांनी केले आहे.