आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार निराधारांना गावातच अनुदान वाटप

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार निराधारांना गावातच अनुदान वाटप

कोविड19 महामारीच्या काळात निराधार व्यक्तींची ग्रामपंचायत सुनेगाव शेंद्री शेनी बनली आधार

अहमदपूर( गोविंद काळे ) कोविड 19 सारख्या जागतिक महाभयंकर महामारीच्या काळामध्ये निराधार व्यक्तींना ग्रामपंचायत सुनेगाव, शेनी, शेंद्री यांनी खूप मोठा आधार दिला आहे.
तिन्ही गावातील निराधार वयोवृद्ध महिला, पुरुष यांचा पगार दरमहा होत असतो. कोविड महामारीच्या काळात बँकेत निराधार व्यक्तींना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रवेश नाकारण्यात आला होता . त्यामुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली होती.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार निराधार व्यक्तींचे पैसे घरपोच देण्याच्या सूचनेवरून बँकेच्या वतीने गावचे माजी चेअरमन मोतीराम जायभाये यांच्या पुढाकाराने राम जायभाये, पत्रकार गोविंद काळे, गोपीनाथ जायभाये यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन मा. शाखा व्यवस्थापक साहेबाना विनंती करून त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना घरपोच आणून दिले.
कोविड 19 सारखी महाभयंकर महामारी पसरली असताना निराधार व्यक्तींसाठी केलेले हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांना मिळालेल्या या पैशामुळे त्यांची आता वाताहत होणार नाही.
सदरील पैसे वाटप गावच्या सरपंच उषा जायभाये व मोतीराम जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गावातील सर्व निराधार महिला, पुरुष, राम जायभाये, पत्रकार गोविंद काळे , गोपीनाथ जायभाये तसेच अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
संचालक आमदार बाबासाहेब पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकार्य केले त्या बद्दल त्यांचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले

About The Author