महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबिर

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबिर

दापका (प्रतिनिधी) : दापका गुडोंपन ता.मुखेड जि. नांदेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त मोफत मधुमेह, रक्तदाब,नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये डॉ. बालाजी झटकोटे,डॉ.श्रीनिवास गव्हाणे, बालाजी सोलापुरे,डॉ.ओम चिट्ठे, डॉ.प्रशांत नवटक्के हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. हे शिबीर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय व मधुर डायबिटीज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.या शिबिरांचे नियोजन काही दिवसापूर्वी करण्यात आले होते, पण गारपीठामुळे व अवकाळी पावसामुळे होऊ शकले नव्हते.

या शिबिरांचे नियोजन व्यंकटराव पाटील दापकेकर, राजप्पा चिट्ठे,सुभाष दापकेकर यांनी केले होते. या शिबिरामध्ये एकूण 222 लोकांची मधुमेहांची व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली.यामध्ये 71 मधुमेही तर 84 रक्तदाबाची रुग्ण आढळून आले.मधुमेहांची व रक्तदाबाची चाचणी सुनील जाधव, नवीन श्रृंगारे, महेश ढगे यांनी केली. ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लाभार्थ्यांच्या वतीने संयोजकाचे आभार मानून कौतुक करण्यात आले.

About The Author