लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जगदीश बावणे तर उपसभापती पदी सुनिल पडिले

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जगदीश बावणे तर उपसभापती पदी सुनिल पडिले

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठित असलेली मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जगदीश बावणे यांची तर उपसभापती पदी सुनिल पडिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

लातूर कृषी उत्पन्न समितीच्या सभापतीपदी व उपसभापतीपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दि 23 मे रोजी सभापती व उपसभापती निवडीसाठी बाजार समिती च्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी सच्चिदानंद नाईकवाडे यांनी कामकाज पाहिले. सभापतीपदासाठी जगदीश बावणे व उपसभापतीपदासाठी सुनील पडिले या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नाईकवाडे यांनी या दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जगदीश बावणे तर उपसभापती पदी सुनिल पडिले

यावेळी माजी सभापती ललीतभाई शहा, नुतन संचालक बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, आनंद पाटील, आनंद पवार, युवराज जाधव, अनिल पाटील, बालाजी वाघमारे, श्री निवास शेळके, लक्ष्मण पाटील, शिवाजीराव देशमुख, शिवाजी कांबळे, सुभाष घोडके, तुकाराम गोडसे, लतिका देशमुख, सुरेखा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. सभापती – उपसभापतींची निवड झाल्यानंतर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने जगदीश बावणे व सुनिल पडिले यांचा सत्कार करण्यात आला.

About The Author