सभापती पदी मंचकराव पाटील तर उपसभापती पदी संजय पवार यांचा विजय
अहमदपूर( गोविंद काळे ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडीची प्रक्रिया आज दि २३ मे रोजी बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली असुन भाजपा युतीच्या उमेदवारांचा पराभव करत सभापती पदी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे मंचकराव पाटील तर उपसभापती पदी कॉग्रेस पक्षाचे संजय पवार हे निवडून आले आहेत.
याविषयी सविस्तर माहीती अशी की दि ३० एप्रिल रोजी अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली होती त्यात महाविकास आघाडीचे १३ जागेवर उमेदवार निवडणुन आले होते तर भाजपा युतीचे केवळ ५ उमेदवार निवडून आले होते आज दि २३ मे रोजी बाजार समितीच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी एम.एस लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती व उपसभापती पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली त्यात महाविकास आघाडीकडून सभापती पदी राष्ट्रवादी पक्षाचे मंचकराव पाटील तर उपसभापती पदासाठी कॉंग्रेस पक्षाचे संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर भाजपा युतीकडून सभापती पदासाठी जिवनकुमार मद्देवाड तर उपसभापती पदासाठी अण्णासाहेब कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते निवडणुक अधिकारी यांनी गुप्त पद्धतीने मतदान घेऊन मतमोजणी केली असता महाविकास आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार मंचकराव पाटील उपसभापती पदाचे उमेदवार संजय पवार यांना प्रत्येकी समान १३ मते पडली तर भाजपा युतीचे सभापती पदाचे उमेदवार जिवनकुमार मद्देवाड तर उपसभापती पदाचे उमेदवार अण्णासाहेब कांबळे यांना प्रत्येकी समान ५ मते पडली असल्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी लटपटे यांनी महाविकास आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार मंचकराव पाटील व उपसभापती पदाचे उमेदवार संजय पवार यांना विजयी घोषीत करून निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी अहमदपूर तालुक्यातील सरपंच , उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्यापारी, हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते सभापती व उपसभापती पदाची निवडणुक बिनविरोध होईल या आशेने आलेल्या सर्वांचा भ्रमनिराश झाला व रखरखत्या उन्हात कित्येक तास सर्वांना निवड प्रकियेची वाट पहात ताटकळत बसावे लागले महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.