17 कोटी 25 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेमुळे हरंगुळ बु गावातील प्रत्येक घराला नळ व शुद्ध पाणी मिळणार – सरपंच सुर्यकांत सुडे

17 कोटी 25 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेमुळे हरंगुळ बु गावातील प्रत्येक घराला नळ व शुद्ध पाणी मिळणार - सरपंच सुर्यकांत सुडे

हारंगुळ बु (प्रतीनीधी) : लातूर शहर मतदारसंघातील हरगुळ बु ता जि लातूर या गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत केंद्र व राज्य सरकार यांच्या वतीने प्रत्येक घराला नळ कनेक्शन व प्रत्येक नागरीकाला शुद्ध पाणी देण्याचा संकल्प खऱ्या अर्थाने आज हरंगुळ बु ता जि लातूर या गावात ही योजना पूर्णत्वास येत आहे प्रत्येक माताभगीनीची पाण्यासाठी होणारी मोठी अडचण आता कियमची थांबणार आहे भविष्यात आपल्या गावाचा सर्वाच्या मदतीने विकास करून मोठ्या प्रमाणात निधी आणुन कोणत्याच प्रकारची कमतरता भासु नये याची दक्षता घेतली जाईल या पाणी पुरवठा योजनेसाठी आ अमित भैया देशमुख साहेब, आ धिरज भैया देशमुख साहेब यांनी मंजुरीसाठी खुप मोठे सहकार्य केल्यामुळे या कामाची प्रत्येक्ष सुरवात झाली आहे.

तसेच गावातील अंतर्गत रस्ते दर्जेदार केले आहेत आणी गावाला जोडणारे रस्ते महिला तंत्रनिकेतन लातूर ते हरंगुळ बु हा रस्ता 90 लक्ष रूपये, कळंब रोड ते हरंगुळ बु 60 लक्ष रूपये निधी खर्च करून डांबरीकरण पुर्ण केले आहे आणी कळंब रोड रेलवे गेट वरवंटी ते हरंगुळ बु हा शिवरस्ता प्रस्तावित आहे यामुळे गावाचा चौफेर विकास होत आहे.

17 कोटी 25 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेमुळे हरंगुळ बु गावातील प्रत्येक घराला नळ व शुद्ध पाणी मिळणार - सरपंच सुर्यकांत सुडे

गावकऱ्यांची महत्वाची गरज ओळखून कायमचा पाण्याचा प्रश्न या योजनेमुळे मिटणार आहे असे हरंगुळ बु गावचे विकासभिमुख सरपंच सुर्यकांत सुडे यावेळी म्हणाले गावाला 17 कोटी 25 लाख रूपये खर्चाची योजना करून मंजुर करून आणली आहे त्या योजनेतुन 1 लाख 81 हाजार लिटर पाणी क्षमता असलेले जलकुंभाचे भिमीपुजन दिनांक 21 मे रोजी सकाळी 10 वाजता सरपंच सुर्यकांत सुडे यांच्या हास्ते करण्यात आले गावाला नागझरी धरणातुन पाईपलाईन करून जलकुंभात पाणी सोडुन विठ्ठल नगर ,विकास नगर ,सदाशिव नगर,गोविंद नगर राजानगर ,वसवाडी,गोकुळधाम,मंदारवस्ती येथील नागरीकांना मुबलक पाणी मिळणार आहे लातूर शहराजवळ गाव असल्याने 14 हाजार लोकसंख्या आहे बरेच बाहेरचे कुटुंब येथे रहात असुन प्रत्येकांनी मतदान नोंदणीची रितसर प्रक्रिया पूर्ण करावी असेही आवाहन यावेळी सरपंच सुर्यकांत सुडे यांनी केले आहे या कार्यक्रमास शाखा अभियंता खरोसेकर ,शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेळके ,चंद्रकांत खटके,गुतेदार सुरेश लहाणे यांचे सविस्तर भाषणे झाली , ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गुरमे,भगवान भालेराव ,विलास आडसुळे विजयकुमार वाघमारे , ,पंकज सुतार, यांच्यासह महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए एम सुर्यवंशी तर आभार प्रदर्शन डी बी राऊत यांनी केले.

गावकऱ्यांना या योजनेमुळे भविष्यात पाणी कमी पडणार नाही – शाखा अभियंता खरोसेकर

हरंगुळ गावाची भविष्यातातील लोकसंख्या लक्षात घेता 2054 साली दररोज 30 लाख लिटर पाणी लागणार आहे 50 कि मी पाईपलाईनचे काम चालु आहे 3300 नळ कनेक्शन जलजीवन मिशन योजनेंतर्गत जोडले जाणार आहेत व याचे काम आम्ही संबंधीत कंत्राटदारांकडून दर्जेदार करून घेणार आहोत हर घर नळ जल हे या योजनेचे मुख्य संदेश आहे त्याची अंमलबजावणी तंतोतंत करून प्रत्येक वस्तीवरील कुटुंबाला यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे गावात पाणी मुबलक मिळावे हा या योजनेमागचा मुख्य हेतु असल्याने भविष्यात हरंगुळ बु गावास पाणी कमी पडणार नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता श्री खरोसेकर जलकुंभ भुमीपुजन प्रसंगी म्हणाले.

About The Author