राज्य उत्पादन शुल्क विभागाची उत्कृष्ट कामगिरी !! अवैद्य दारू विक्रेत्यांची जिरवली दादागिरी !!!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची उत्कृष्ट कामगिरी !! अवैद्य दारू विक्रेत्यांची जिरवली दादागिरी !!!

 लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने देवणी तालुक्यातील तळेगाव भागात बनावट, बोगस आणि रसायनमिश्रित मद्य विक्री केली जात असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे येत होत्या. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग च्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, विभागीय उपायुक्त पी एच पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे दिले होते.त्या आदेशान्वये बारगजे  यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून आपली तडफदारी दाखवून दिली आहे.

 दिनांक 31 मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लातूर येथील बारा नंबर पाटी, पेट्रोल पंपाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून 162 लिटर गोवा राज्य निर्मिती विदेशी मद्य आणि या दारूची वाहतूक करण्यासाठी वापरात येणारी एक टाटा टियागो चार चाकी वाहन क्रमांक एम एच 24 ए एस 32 54 असे एकूण दोन लाख 21 हजार 500 रुपयाचा अवैध मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण मसू शिखरे (सव्वीस वर्षे) रा. तळेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 88/ 21 नोंद करण्यात आला आहे. याच रात्री शोध घेऊन पहाटे चार वाजण्याच्या सुमारास म्हणजेच दिनांक 1 जून 2019 रोजी पहाटेच्या वेळी एस के ट्रेडर्स या पत्र्याच्या शेडमध्ये कातपुर रोड, लातूर तालुका जिल्हा लातूर येथे छापा टाकून गोवा राज्य निर्मित 262 अवध मद्य साठा तसेच एक अल्टो कार चार चाकी वाहन क्रमांक एम एच 24 /व्ही20 14 असे एकूण एक लाख 77 हजार तीनशे वीस रुपयांचा अवध मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आररोपी दत्ता श्रीरंग कावळे (वय 38 वर्ष) राहणार बोधे नगर लातूर आणि रजनीकांत राम कावळे (वय 35) राहणार बसवेश्वर गल्ली आझाद चौक लातूर या दोन आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक 89/ 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातूर जिल्हा अधीक्षक गणेश बारगजे, लातूरचे निरीक्षक राहुल बांगर, उदगीरचे निरीक्षक महादेव झेंडे, जवान अनिरुद्ध देशपांडे, निलेश गुणाले, हनुमंत मुंडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंखे, एकनाथ फडणवीस यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

 यापुढेही अशा स्वरूपातील अवध मद्य विक्री, वाहतूक, निर्मिती विरोधामध्ये मोहीम चालू राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी दिली आहे. अवैध व परराज्यातील मद्य विक्री, वाहतूक होत असल्यास याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयास कळविण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

About The Author