लातूरकरांना मिळाला दिलासा; रुग्ण संख्या दोन आकड्यात
नवीन 98 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात आज 395 कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत तर आजपर्यंत जिल्ह्यातील 84758 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 98 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. मागील अनेक दिवसानंतर प्रथमच लातूर जिल्ह्यातील कोरूना बाधित रुग्णांची संख्या दोन आकड्यात आल्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यात आज 1081 आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत. 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1651 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 60 जण पॉझिटिव्ह आढळून आले. लातूर जिल्ह्यात एकूण 2732 चाचणी पैकी 98 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88929 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2022 आहे. लातूर जिल्ह्यात आज 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जाहिर करण्यात आले तर आजपर्यंत 2149 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 84758 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 418 आहे.