नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारत जगाचे नेतृत्व करेल – आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झालेली आहेत.या 7 वर्षामध्ये पंतप्रधान मोदीनी भारताची जागतीक स्थरावर एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. जगातील विविध देशाशी संबंध सुधारण्याचे काम केल्यामुळे जागतीक स्थरावर देखील भारताला वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. मोदीनी केलेल्या जागतीक स्थरावरील कार्याबददल अमेरीका, रशीया, ब्राझील, यासह 8 राष्ट्रानी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना उच्च सन्मानपत्र देउन गौरविण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारणे अनेक विधायक निर्णय घेतले त्यामुळे जगात मोदी सरकारची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे भविष्यातही नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालीच भारत जगाचे नेतृत्व करेल असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 7 वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली त्या बददल आयोजीत वृक्षारोपन, अन्नसेवा, कोवीड-19 हेल्पलाईन, व ऑक्सीजण मशिनचे लोकार्पण अशा विविध कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र विद्यालयाच्या परिसरात आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, सरचिटणीस सागर घोडके, अमेाल गीते, गणेश गोजमगुंडे, गजेंद्र बोकण, संतोष तिवारी, आकाश बजाज, चंद्रशेखर पाटील, गणेश पवार, राहूल बिराजदार, योगेश मोरतळे, यशवंत कदम, नवनाथ ढेकरे, गोविंद सुर्यवंशी, उमेश इरपे, आदी मान्यवरांची उपस्थीती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, कोरोणा काळात विविध देशाला मदत करण्याचे काम पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारणे केले. देशाला पुढे घेउन जाण्याच्या दृष्टीने अनेक विधायक निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी हितासाठी करण्यात आलेला कृषि कायदा, याबरोबरच 21 व्या शतकामध्ये प्रभावी ठरणार्या शिक्षणाचे महत्व लक्षात घेउन सीबीसीएस शिक्षण पध्दती लागू करून देशातील तरूणांना वेगळी संधी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. कश्मीरचे 370 कलम हटवुन कश्मीरला भारतामध्ये सामील करून न्याय देण्याचे काम केले.तीन तलाक पध्दत रदद करण्याचा निर्णय घेतला.भगवान राम मंदीरासंदर्भात न्याय देवतेच्या निर्णयाचे स्वागत करून मंदीराचा शुभारंभ केला. तसेच उद्योजकासाठी विविध योजना राबवुन उद्योगाना चालना देण्याचे कामही मोदी सरकारणे केले. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रीलीयन डॉलर करण्याचे ध्येय समोर ठेवुन त्या पध्दतीने पायाभूत सुविधा देण्याचे काम केले. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाला महत्व दिले तसेच सर्व सामान्य मानसाला न्याय देउन भ्रष्ठाचार मुक्त व निष्कलंक कारभार करण्याचे कामही याच शासनाने केेले..
गेल्या दिड वर्षापासुन कोरोणा महामारीमुळे विकासाला मोठी खीळ बसली आहे. तरी त्या संकटाला तोंड देत देशाला महाशक्ती बनविण्याचे स्वामी विवेकानंदाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साकार करतील असा विश्वासही भाजपा नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
अटल अन्नसेवेचे कौतूक
भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाअध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली कै.नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ गेल्या 22 दिवसापासुन अटल अन्नसेवा सुरू आहे. यामुळे शासकीय सर्वोपचार रूग्णालयातील रूग्ण व नातेवाईकाची सोय झाली आहे. ही अन्न सेवा सेवावृत्तीने भाजयुमोचे पदाधिकारी करीत आहेत कोवीडच्या प्रतिकुल परिस्थीतीतही अन्न सेवेबरोबरच घरपोच ऑक्सीजन मशिनच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम सुरू केलेले आहे त्यामुळे भाजपायुमोने सुरू केलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.