ना. संजय बनसोडे यांनी शब्द पाळला- जावेद शेख
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा शब्द राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी पाळला आहे. सर्व मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर विकास निधी खेचून आणला आहे. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा लोणी ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख यांनी काढले. लोणी गावच्या विकास कामासाठी ना. संजय बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. मूलभूत कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विकासाच्या संदर्भात जो जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडीने दिला होता, त्या जाहीरनाम्याची वचनपूर्ती सध्या चालू आहे. अल्पावधीतच उदगीरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. असेही सांगितले.
या सीसी रोड च्या कामाचे उद्घाटन उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळकर, प्रवीण भोळे, श्याम डावळे, समीर शेख, लोणी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी बब्रुवान पाटील, माजी सरपंच उत्तम बिरादार, माजी उपसरपंच नरसिंग कांबळे, सोपान कांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड,इफरोज शेख, गोविंद घुगे, बबन फड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.