सामाजिक जाणीवा जपत आ. रमेशअप्पांचा वाढदिवस साजरा- पंडितराव सुकणीकर
उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे धडाडीचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या सामाजिक जाणीवा जपण्याच्या प्रवृत्तीला आदर्श समजून सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केला. आदर्श संस्कृती सर्व कार्यकर्त्यांनी जपावी आणि नेत्याचे मोठेपणीही जपावे. असे उद्गार याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडितराव सुकणीकर यांनी व्यक्त केले. आ. कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. एक आक्रमक आणि दूरदृष्टी आणि विकासाची दृष्टी असलेल्या नेत्याच्या साठाव्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शहरातील अनेक रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व्यक्तिगत पातळीवर रक्तदान शिबीर आणि समाज प्रबोधन असे विविध कार्यक्रम पंडितराव सुकणीकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस शामल कारामुंगे, भाजपा शहराध्यक्ष उदय सिंह ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मजगे, नगरसेवक नागेश आष्टुरे, भारतीय जनता कासान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी (भालके), डॉ. सेलचे विभागीय सहसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर नाबदे, ल की पाटील, शक्ती प्रमुख चंद्रकांत बिरादार, सागर बिरादार, बबीता पांढरे, जिल्हा उपाध्यक्ष जया काबरा, महिला आघाडी शहराध्यक्ष मधुमती कलशेट्टे, अजय पाटील, समीर परगे, विरलाल कांबळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.