स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकली जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकली जप्त

 लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जून महिन्याच्या पूर्वसंध्येलाच पुन्हा धडाडीची कामगिरी करत संशयित आणि सराईत असलेल्या गुन्हेगारांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या, घरफोड्या, दरोडे यासोबतच गंभीर दुखापतीचे गुन्हे अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडे सोपवल्या नंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी तपास पथके बनवून पोलिसांच्या रेकॉर्डवर वांटेड असलेले आणि सराईत गुन्हेगार यांना पकडण्यासाठी सूचना केल्या होत्या. सदरील सूचनांचे गांभीर्य विचारात घेऊन या विशेष पथकाने दिनांक 31 मे 2021 रोजी जबरी चोरी, घरफोडी आणि गंभीर दुखापतचे गुन्हे करणारा आणि लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 50/ 21 कलम 307 भा द वि या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असणारा सराईत गुन्हेगार संतोष शेखर पाटोळे रा. जय नगर लातूर यास अटक केली. संतोष शेखर पाटोळे त्याच्यावर लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन, विवेकानंद चौक पोलिस स्टेशन, शिवाजी नगर पोलिस स्टेशन, गांधी चौक पोलीस स्टेशन यांच्यासह जिल्ह्यातील इतरही वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 त्यातच लातूर ग्रामीण येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 50/20 या गुन्ह्यात तो फरार होता 31 मे रोजी तो औसा रोडवरील एका ढाब्याच्या मागे बसलेला असल्याची माहिती या तपास पथकाला लागल्यानंतर या विशेष तपास पथकातील पोलिस अमलदार अंगद कोतवाड, युसुफ शेख, राजेभाऊ म्हस्के, सचिन दरेकर, नितीन कटारे, नागनाथ जांभळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून त्याला चतुर्भुज केले. इतर वेळेस पोलिसांची चाहूल लागताच पळून जाणारा हा अट्टल गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्यात तो पाहिजे असल्याने लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. या पोलिसांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

About The Author