शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते नुतन सभापती उपसभापती यांचा सत्कार

शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते नुतन सभापती उपसभापती यांचा सत्कार

अहमदपुर ( गोविंद काळे ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मंचकराव पाटील तर उपसभापतीपदी संजय पवार यांची नुकतीच निवड झाल्याच्या निमित्ताने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
नवनिर्वाचित सभापती माननीय श्री मंचकराव पाटील व उपसभापतीपदी माननीय श्री संजय पवार यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी ‘शिवनेरी’ शिवसेना कार्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्या, तसेच प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळल्या बद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांचा सत्कार नुतन सभापती मंचकराव पाटील यांनी केला. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीत विजयश्री खेचून आणल्या शिवाय स्वस्थ बसायच नाही, सर्व सामान्य शिवसैनिकांना योग्य न्याय देण्यात येईल असे यावेळी आश्वासन दिले.
या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई पवार, तालुका संघटक व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रा.संतोष रोडगे सर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माधव पवार, नगरसेवक संदीप चौधरी, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, तिरुपती पाटील, जेस्ट शिवसैनिक माननीय श्री माधव कासले, उप शहर प्रमुख शिवकुमार बेंद्रे, शिवा भारती, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले , सहसचिव पद्माकर पेंढारकर, बालासाहेब पडीले अजय सुरनर प्रदीप शिंगडे ,गणेश राठोड, गणेश चव्हाण, दामोदर घोरपडे व शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!