अहमदपूर (गोविंद काळे) सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यशवंत विद्यालयाची माजी विद्यार्थिनी पल्लवी संग्राम सांगळे- गुट्टे यांची सबंध देशात स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत 452 रँक घेऊन तिने नेत्र दीपक यश संपादन केले आहे.
पल्लवी अगदी शालेय शिक्षणापासून अतिशय हुशार, आणि चाणाक्ष विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होती. तिचे दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण यशवंत विद्यालयात, बारावी महात्मा गांधी महाविद्यालयात, अभियांत्रिकी शिक्षण व्ही जे टी आय मुंबई येथे झाले असून स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे येथे केलेली आहे. ती पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली नाही पण दुसऱ्या वेळी अत्यंत आत्मविश्वासाने अभ्यास करून तिची आय ए एस पदी निवड झालेली आहे.
पल्लवीचे बी ई मेकॅनिकल चे शिक्षण झाले असून तिचे मूळ गाव रामाची वाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड, आई मीनाक्षी गृहणी, वडील सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक संग्राम सांगळे, अभियंता पंकज आणि अभियंता प्रिया ही बहीण असून त्यांची सासरवाडी अहमदपूर ची आहे. पल्लवीचे सासर नांदेड असून तिचे सासरे नांदेड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे, पती सौरभ गुट्टे इन्फोसिस मध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सासू मीरा गुट्टे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपक्रमशील सहशिक्षिका आहेत.
इंजीनियरिंग झाल्यानंतर मास्टर इन पब्लिक हेल्थ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथून पूर्ण झालेले आहे . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द चिकाटी, परिश्रम व आत्मविश्वासाचा जोरावर ती अभ्यासाला लागली आणि दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाली.
तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे, राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी, पल्लवीचे मामा माजी जि प सदस्य मदन मुसळे, उद्योजक मनोज मुसळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.