पु.अहिल्यादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९७% निकाल

पु.अहिल्यादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९७% निकाल

विज्ञान शाखा – ९९.०३%
कला शाखा – ९३.६५%

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सांगवी (सू) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता बारावीचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगला लागला.विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९.०३% लागला असून परीक्षेस १०४ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विज्ञान शाखेतून सर्वप्रथम सय्यद सादिया महेताब ही विद्यार्थिनी आली असून तिला ८२.१७% गुण मिळाले तर विशेष प्राविण्य प्राप्त ७ जण, प्रथम श्रेणीत ४९, द्वितीय श्रेणीत ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेचा निकाल ९३.६५% लागला असून ६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.कला शाखेतून हनवते ऋतुजा मूनेश्वर ही विद्यार्थिनी ८६.५०% घेऊन प्रथम आली तर विशेष प्राविण्यासह ३, प्रथम श्रेणीत २४, द्वितीय श्रेणीत २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. करिता संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे हाके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, संस्थेचे कोषाध्यक्ष अमरदीपजी हाके, संचालक सुरेंद्र चाकूरकर आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले.या प्रचंड यशाबद्दल पालकांतूनही अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!