कृ.उ.बा उप-समिती किनगावला शिवसेना (ठाकरे गट ) नेते कै. मधुकर दादा मुंडे यांचे नाव
अहमदपूर ( गोविंद काळे ) -कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर अंतर्गत येणाऱ्या किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार उप-समितीला नवनिर्वाचित सभापती यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करून शिवसेना नेते ( ठाकरे गट ) कै. मधुकर दादा मुंडे यांचे नाव सर्वानुमते बिनविरोध देण्यात आले
याविषयी सविस्तर माहीती अशी, की अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच निवडणुक झाली होती या निवडणुकीत महाविकस आघाडीचे बहुमत होऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे मंचकराव पाटील यांची सभापती पदी निवड करण्यात आली होती निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी यांनी आश्वासन दिले होते की कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात आली तर शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कै.मधुकर दादा मुंडे ,कृषी उत्पन्न बाजार समिती किनगाव हे नाव देण्याचे आश्वासन मतदारांना देण्यात आले होते त्या आश्वासनाची पुर्तता दि. ३१ मे रोजी सभापती मंचकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समीती येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीत करण्यात आली शिवसेनेचे संचालक संतोष रोडगे यांनी बैठकीत नाव सुचवले तर अनुमोदन शिवसेनेचे संचालक किसन पाटील यांनी दिल्या नंतर सर्वानुमते बिनविरोध बहुमताने ठराव मंजुर करण्यात आला
या बैठकीस उपसभापती संजय पवार सचिव ओम उगिले संचालक रामदास कदम, बालाजी कातकडे, सतीश नवटक्के, किशन पाटील, संतोष रोडगे, सौ. कैवल्या नागमोडे, सौ. इंदुबाई पवार, रामचंद्र मद्दे, यशवंत केंद्रे, शिवाजी पाटील, जीवनकुमार मद्देवाड, अण्णासाहेब कांबळे, शिवाजी खांडेकर, धनराज पाटील, विलास शेटे, मुस्तफा सय्यद आदींची उपस्थिती होती