सिध्दार्थ कॉलनी येथील संस्कार बौद्ध विहार येथे दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सिध्दार्थ कॉलनी येथील संस्कार बौद्ध विहार येथे दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील सिद्धार्थ कॉलनी येथे कलापुष्प प्रतिष्ठान च्या वतीने इयत्ता दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अहमदपूर येथील यशवंत विद्यालयातून 100% गुण घेऊन अहमदपूर च्या यशाची परंपरा कायम राखणारा शशांक प्रेमनाथ गायकवाड याच्यासह संबोधी राजेंद्र सोमवंशी आदित्य उत्तम कांबळे आदित्य शंकर मस्के अभिजित परतवाघ या ही गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर नुकतेच सेवानिवृत्त झालेले सहशिक्षक बाबासाहेब कांबळे लेंडेगावकर यांचा ही सेवानिवृत्तीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रा डॉ नारायण कांबळे प्रा डॉ श्रीरंग खिल्लारे विद्रोही कवी राजेंद्र कांबळे सी वाय कांबळे बालाजी तुरेवाले बालाजी वाघमारे प्रभाकर तिगोटे ॲड. रमेश गायकवाड रुपसेन कांबळे सुजित गायकवाड धर्माधिकारी माधव तिगोटे महेन्द्र धसवाडीकर लक्ष्मण कांबळे प्रा डी बी शिंदे प्रा डॉ सतीश ससाणे प्रकाश ससाणे बाबुराव कांबळे साहेब बाबासाहेब वाघमारे पत्रकार त्रिशरण मोहगावकर रोहित कांबळे यांच्यासह आयोजक चंद्रशेखर भालेराव यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!