बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विध्यार्थांची नामांकित कंपन्याच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
संचालक कुलदीप हाके यांनी कॅम्पस मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहित केले.
कॅम्पस मुलाखतीमध्ये बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच अनिल आडे,अजय आडे, संविधान रायबोळे, रितेश वाघमारे, सचिन आडे, केंद्रे मिथिलेश, उळागडे गणेश, शेख परवेज, कोपनर शंकर,शेकडे बालाजी नागरगोजे बालाजी, गबाळे अनिकेत, केंद्रे निखिल, मुंडे हरी ओम, बरुळे शैलेश, बोराळकर रोहित, राठोड ओम, दहिफळे नागेश, चव्हाण दिनेश, मद्दे वैभव, नागरगोजे बालाजी, शेख आखिल,युवराज दुबे, अभिजीत कांबळे, अभिषेक कोपनर जायभाये श्रीकांत ह्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
आमच्या संस्थेमध्ये इलेक्ट्रिकल, वायरमन, वेल्डर,कोपा असे ट्रेड असून या मधील विद्यार्थ्यांनी कॅम्पस मध्ये सहभागी होऊन नामांकित कंपनीमध्ये आपले स्थान निर्माण केले.
या कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कॅम्पस मुलाखतीसाठी संचालक अमरदीप हाके प्राचार्य मदन आरदवाड निदेशक कागणे सर निदेशक चव्हाण मंगेश निदेशक बालाजी लवटे आदींनी परिश्रम घेतले.