शालांत प्रमाणपत्र परीक्षे परीक्षेत यशवंत विद्यालयाची नेत्रदीपक भरारी

शालांत प्रमाणपत्र परीक्षे परीक्षेत यशवंत विद्यालयाची नेत्रदीपक भरारी

यशवंत विद्यालयाचे 100% गुण घेणारे 18 विद्यार्थी 90% च्या पुढे गुण घेणारे 150 विद्यार्थी

अहमदपूर ( गोविंद काळे) मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयाची कु. नागरगोजे संस्कृती प्रदीपराव या विद्यार्थिनीने 494 गुण घेऊन लातूर विभागीय शिक्षण मंडळात सर्व द्वितीय राहून यशाची परंपरा कायम केल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
शाळेतून 100% गुण घेतलेले 18 विद्यार्थी असून त्यात संस्कृती प्रदीप नागरगोजे 494 गुण सर्वप्रथम, कु.वैष्णवी बालाजी बिराजदार 492 गुण घेवून द्वितीय, किरण मारुती गुट्टे 492 घेऊन द्वितीय, कु.आर्या मोहनराव देशमुख 491 गुण घेऊन तृतीय, शिवहर बालाजी दहिफळे 491 गुण घेऊन तृतीय, सुरज संजय राव हेमनर 491 गुण घेऊन तृतीय, शशांक प्रेमनाथ गायकवाड 490 गुण घेऊन चौथा, रमण गोपाळ गुरमे 490 गुण घेऊन चौथा, अजिंक्य शरद मुसळे 489 गुण घेऊन पाचवा, कु.आर्या अनिल गुळवे 488 गुण घेऊन सहावी, कु. भक्ती बालाजी गुरुडे 487 गुण घेऊन सातवी, कु.श्वेता रवींद्र सूर्यवंशी 487 गुण घेऊन सातवी, ऋषिकेश राजू केंद्रे 486 गुण घेऊन आठवा, कु.सृष्टी शिवराम नलाबले 486 गुण घेऊन आठवी, कैलास चंद्रकांत चाटे 485 गुण घेऊन नववा, कु. संध्याराणी मुंजा हरी भाले ४८५ गुण घेऊन नववी, कु.श्रावणी ज्ञानोबा इप्पर 485 गुण घेऊन नववी, कु. सृष्टी शिवशंकर पाटील 485 गुण घेऊन नववी राहिलेली आहे.
शाळेतून 491 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 485 पास झालेले असून शाळेचा शेकडा निकाल ९८.७७ %असून विशेष प्राविण्य 337, प्रथम श्रेणी 113, द्वितीय श्रेणी 33आहेत.
गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक गजानन शिंदे, सोमनाथ स्वामी, राम तत्तापुरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदनव कौतुक केले आहे.
यावेळी टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी म्हणाले की गेल्या वर्षभरात सातत्याने आमच्या शिक्षकाने प्रामाणिकपणे केलेली मेहनत, परिश्रमा मुळेच यश मिळाल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या वेळी प्राचार्य व्ही व्ही गंपले पत्रकाराशी बोलताना म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून नियमितपणे दहावीचे वर्ग घेऊन, लवकर अभ्यासक्रम पूर्ण करून, जास्तीच्या सराव परीक्षा घेऊन, वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान शिक्षकांनी केल्यामुळे आणि पालकांच्या विशेष सहकार्यामुळे, आमचा निकाल चांगला लागल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

About The Author