किलबिल नॅशनल स्कूल ची 100% निकालाची परंपरा कायम
100 टक्के गुण घेणारे 3 विद्यार्थी
अहमदपूर ( गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल जवळगा तालुका अहमदपूर या शाळेचा नुकताच दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदरील परीक्षेमध्ये शाळेतील एकूण 54 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते त्यापैकी मेनकुदळे श्रेयस, कांबळे मयुरेश, गोडभरले संस्कार या तीन विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण घेऊन किलबिलच्या यशाची परंपरा कायम ठेवली. त्यासोबतच कु चामे राधिका 99.60, भगनुरे चंद्रशेखर 99.20, सुरजमल मानसी 98.60, पाटील श्रद्धा 97.80, मुंडे नमन 97.80, पाटील ऋतुजा 97.20, सूर्यवंशी स्नेहा 97.20, गुरुमे यशिता 97.20, पठाण अफान 97.00, मेनकुदळे स्नेहल 96.60, राचमाळे आदित्य 95.80, लटपटे आर्यन 95.80, जंगवाड प्रणव 95.20, व जायभाये निखिल 95.20% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील एकूण 54 पैकी 17 विद्यार्थी हे 95 टक्के गुणापेक्षा अधिक तर 90% गुणांपेक्षा अधिक गुण घेणारे 28 विद्यार्थी आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील परवेज शेख, राजेंद्र परगे, प्रकाश कांबळे, बालाजी भोगे, सद्दाम हुसेन, संतोष मुंढे, श्रीधर अडिके, आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. अशा सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले आदींनी अभिनंदन केले.