पु.अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयाचा ९६.९७% निकाल
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील सांगवी (सू) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगला लागला असून परीक्षेस ६५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पारशेवार मारोती ज्ञानेश्वर हा शाळेतून सर्वप्रथम आला असून त्याला ९०.८०% गुण मिळाले तर देवकते शिवकन्या हणमंत ही द्वितीय आली असून तिला ८६.८०% गुण, तर खांडेकर मायावती परमेश्वर ८६.००% गुण घेऊन तृतीय आली आहे.एकंदरीत २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये विशेषतः साबणे मच्छिंद्रनाथ विठ्ठल ८५.२०%, कांबळे अजित बबन ८५.००%,कुंडगीर ऋतुजा पिराजी ८२.६०%,शेख घुडुसाब मुबारक ८२.४०% ,देवकते संजीवनी मधुकर ८१.४०% , सुरनर संतोषी लिंबाजी ८१.००% ,सुरनर कुलस्वामिनी गणेश ८०.८०% ,सुरनर शिवकन्या प्रभाकर ८०.६०% , उप्परवाड शिवम सिताराम ८०.६०% असे गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे हाके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, संस्थेचे कोषाध्यक्ष अमरदीपजी हाके, संचालक सुरेंद्र चाकूरकर आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले.या भरघोस यशाबद्दल पालकांतूनही अभिनंदन होत आहे.