सिद्धेश्वर विद्यालयाच्या प्राचार्य पदी गिरीधर कणसे
चाकूर (गोविंद काळे) : झरी बु. येथील सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी गिरीधरराव कणसे पाटील यांची निवड झाली असून त्यांचा चंचल भारती विद्या विकास मंडळाच्यावतीने त्यांना पदभार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नुतन प्राचार्यपदी गिरीधरराव कणसे पाटील यांची निवड झाल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंचल भारती विद्याविकास मंडळाचे समन्वयक श्रीहरी पवार, निवृत्त प्राचार्या श्रीमती रशिकाताई देशपांडे यांच्या हस्ते नूतन प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कै.पू.ल. दोडके सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी निवृत्त प्राचार्या श्रीमती रसिकाताई देशपांडे, विज्ञान विभागाचे निवृत्त सहशिक्षक प्रल्हाद महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सहशिक्षक एन,बी,पाटील, एच,पी जाधव,नवनाथ वाघमारे, निळकंठ सकनुरे, सोमनाथ वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन प्राचार्य कणसे पाटील म्हणाले की सर्व कर्मचारी बांधवांना सोबत घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.काम करणाऱ्यांना शाबासकी आणि उत्तेजना देण्याचे काम करावयाचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शाळा नावलौकिक मिळू शकत नाही.म्हणून आपल्या सर्वांना सोबत घेऊन शाळेच्या निकालाचा चढता आलेख उभा करायचा आहे.
शाळेला गावाचा आणि गावाला शाळेचा आधार झाला की शाळेतील विद्यार्थी सर्वोच्च ध्येय गाठू शकतात.सिद्धेश्वर विद्यालय हे विद्या मंदिर असून सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थी हे आपले दैवत आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक बांधवांनी कर्मयोगी झाले पाहिजे.कोरोना संपुष्टात आल्यावर परत एकदा जोमाने शाळेला सुरुवात आपल्याला करावयाची आहे असेही नूतन प्राचार्य गिरीधरराव कणसे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन प्रख्यात निवेदक प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी तर आभार जयेशकुमार करडीले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वैजनाथ सुरनर, प्रा. दयानंद झांबरे, व्यंकट सिंदगे, विनय नखाते, हनुमंत तावरे, भालचंद्र डांगे, मुराद शेख आदींनी प्रयत्न केले.