शुद्ध ऑक्सिजन’ चा ऊर्जा स्रोत : अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय …!

शुद्ध ऑक्सिजन' चा ऊर्जा स्रोत : अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय ...!

महाविद्यालय परिसर घनदाट झाडीने बहरले
राजमाता ‘जिजाऊ उद्याना’त
औषधी वनस्पतींसह विविध प्रकारची १२१३वृक्ष संगोपन

अहमदपूर (एल.पी.उगिले) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात व महाविद्यालयाच्या ‘राजमाता जिजाऊ उद्यानात ‘हिरवीजर्द घनदाट ‘झाडी’असून माणसांसह प्राणिमात्रांनाही जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायू (ऑक्सिजन) ची नितांत गरज असते. सध्याच्या ‘कोरोना’ महामारीत सर्वप्रथम रूग्णांचा ऑक्सिजन तपासला जातोय. विद्यार्थ्यांना या शुध्द प्राणवायूची शंभर टक्के उपलब्धता करून देऊन आरोग्य अबाधित ठेवणारे हे एकमेव महाविद्यालय आहे.
बालाघाटाच्या कुशीत वसलेले महात्मा फुले महाविद्यालयाच्या परिसरात सद्यस्थितीत पिंपळ , तुळशींसह विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीसह व १२१३ वृक्षांची संख्या हिरव्या जर्द रुपात आकाशाच्या निळाईकडे झेपावत आहे .
शहरातील महात्मा फुले महाविद्यालय हे एक नामांकित महाविद्यालय असून, महाविद‌यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून ‘राजमाता जिजाऊ उद्यान ‘सहयोगाने साकारले आहे. या उद्यानाच्या संगोपणासाठी व संरक्षणासाठी महाविद्यालयात अग्रेसर असलेल्या ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ या उद्यानाची देखरेख करीत आहे तर यासाठी महाविद्यालयात कार्यरत असलेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नासिक चे अभ्यास केंद्र वृक्ष संगोपण व संवर्धनासाठी मोलाची भूमिका निभावत आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश करता क्षणी विद्यार्थी, पालक, अभ्यागतांचे चटकण लक्ष या उद्यानाकडे वेधले जाते. ते क्षणभर नव्हे तर बराच वेळ स्वतःला हरवून जातात.
या राजमाता उद्याना मध्ये असलेल्या वृक्षांची संख्या पाहता त्यात आवळा ३, गुलमोहराचे २, अशोकाचे ४५, नोनी १, सदाफुली ३९१, कुंडयातील शोभिवंत फुलझाडे ४१, मोरपंखी १०, स्वस्तिक ५, नंदिनी १, बोगनवेल ६५ , सप्तपर्णी१ , चाफा ३ , पैताड २ , पारिजातक ३, कुंदा ४ , नारळ ४, निळ्या फुलांच्या वेली ४, बॉटल पाम १५, रॉयल पाम ९ , पायकस ३५, बदाम २ , बाड ३४५ , कोरफड ११, इलायची २ , अडुळसा २ , निलगिरी २ ,करंजी ११ , टिकुमा ४० , कदंब १ , पिंपळ १ , महात्मा १५ , जास्वंद ३ , लिंबुनी १, तुळशी १२५ अशी एकूण १२१३ वृक्षसंख्या आहे. मागच्या वर्षी वृक्षसंख्या ११४३ होती त्यातील २० वृक्षांची नैसर्गिक बद्दलामुळे घट झाली तर नविन ८० वृक्ष मागील वर्षी लावण्यात आली आहेत. सद्य: स्थितित महाविद्यालय परिसरात १२१३ वृक्ष असल्याची माहिती येथील कृतीशील तथा पर्यावरणप्रेमी प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांनी दिली .
या वरील वृक्षांपैकी नोनी , कोरफड , अडुळसा, इलायची, पिंपळ, जास्वंद, लिंबोणी, तुळस, निलगिरी, सदाफुली, बेल आणि आवळा अशा एकूण१२ प्रकारच्या औषधी वृक्षांच्या जाती या उद्यानात आहेत.

————-चौकट ————–
महाविद्यालय हे प्राणवायू पूरक बनविण्यात कर्मचारी, विद्यार्थ्यासह अहमदपूरकरांचे ही योगदान – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील. महाविद्यालयाच्या’ राजमाता उद्यानात ‘विविध औषधी वनस्पतींसह विविध ३५ प्रकारच्या वृक्षांच्या जातीचे वृक्षारोपन करण्यात आले आहे . प्रत्येक वृक्षांची योग्य वाढ होण्यासाठी, योग्य वातावरण निर्माण केले जाते. त्यांची देखभालही एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांकडून व महाविद्यालयाच्या कार्यतत्पर कर्मचाऱ्यांकडून केली जाते. महाविद्यालयाचा परिसर ‘हरित’ करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयास वृक्षाचे रोपटे भेट दिले. तसेच निसर्ग नर्सरी अहमदपूरचे शंकर डोंगरे हे वेळोवेळी महाविद्यालयास भेट देऊन वृक्षसंगोपणा संदर्भात मार्गदर्शन करतात .

————–चौकट————

महाविद्यालय हे 'ऑक्सिजन'पूरक,'हरित महाविद्यालय, 'स्वच्छ महाविद्यालय व्हावे'... ! - डॉ.पी.डी. चिलगर 

महाविद्यालयाचे अभिनव उपकम्रशील, कार्यकुशल, पर्यावरणप्रेमी, आदर्श प्रशासक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व आम्ही सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करतो. यामध्ये राजमाता ‘जिजाऊ उद्यानाची’निर्मिती करून बालाघाटाच्या कुशीत बसलेले महात्मा फुले महाविद्यालयाचे पाचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ते बरोबरच अल्पावधीत ‘ ऑक्सिजनपूरक – हरित महाविद्यालय, सुंदर व स्वच्छ महाविद्यालय ‘म्हणून नावारूपास आले, असे मत कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी व्यक्त केले.

About The Author